मुंबई : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचारसभांना सुरूवात झाली आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकामागोमाग अशा दोन सभा घेतल्या... विक्रोळीतली प्रचारसभा पार पडल्यानंतर राज ठाकरे पोहचले विलेपार्ल्यात...


हळवे कोपरे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राज ठाकरेंना आपल्याला प्रचारसभांना उशीर झाला हे सांगताना आई-वडिलांचीही आठवण झाली. आपला मुलगा - अमित ठाकरे हॉस्पीटलमध्ये होता... काल घरी आला... असं सांगतानाच 'अशावेळी पालकांना काय वाटतं, ते आत्ता समजतंय... आम्ही तरुण होतो त्यावेळी बाईक फास्ट चालवायचो... आई-वडील सांगायचे सावकाश जा... पण आत्ता स्वत: आई-वडील झाल्यानंतरच समजतंय की ते असं का सांगायचे' असं म्हणत राज ठाकरेंना काही हळवे क्षणही आठवले.


'मुख्यमंत्री म्हणजे शिक्षकांना आवडणारा विद्यार्थी'


'सीएम म्हणजे मॉनिटर... शिक्षकांना आवडेल असा विद्यार्थी... त्या दिवशी आवाज बसला त्यांचा... कशाला ओरडतात... माईक आहे ना...' असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली.


सेनेवर टीका


दुसरीकडे सेना हे करणार... ते आणणार... पण काय केले ते सांगावे सेनेनं... फक्त करमणूक सुरू आहे... तुम्ही इतकी वर्ष सत्तेत असताना जनतेला बागा, मैदानं, मराठी शाळा दिल्या नाहीत... पण, बेहरमपाडा, झोपड्या वाढतात, उर्दु शाळा वाढतात...' असं म्हणत त्यांनी शिवसेनेवरही तोंडसुख घेतलं.


उल्लेखनीय म्हणजे, रात्री दहा वाजून काही मिनिटे झाले तरी राज ठाकरे भाषण सुरू होतं.