ठाण्यानंतर नवीमुंबई, कल्याण-डोंबिवलीतही `साफ-सफाई`
मात्र मुंबई महापालिका मात्र ढिम्मं आहे. कारवाईतला `क`ही आयुक्त अजोय मेहता उच्चारत नाहीयेत.
मुंबई : मुंबईच्या भोवती असलेल्या महापालिका म्हणजे ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली. या तीनही महापालिकांनी अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवायला सुरूवात केलीय.
ठाण्यात संजीव जयस्वाल यांनी तर गेला आठवडाभर 10 विशेष पथकांच्या सहाय्याने ठाणे साफ करायला सुरूवात केलीय. त्यातून प्रेरणा घेऊन कल्याण डोंबिवलीचे आयुक्तही कामाला लागले.
तिकडे नवी मुंबईत तुकाराम मुंढेही अवैध धंदे करणाऱ्यांचा कर्दनकाळ होत आहेत. मात्र मुंबई महापालिका मात्र ढिम्मं आहे. कारवाईतला 'क'ही आयुक्त अजोय मेहता उच्चारत नाहीयेत.