मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये रिपाइं स्वबळावर
मुंबई वगळता राज्यातल्या 9 महापालिकांमध्ये रिपाइं आठवले गट आणि भाजपची युती नसल्याचं रिपाइंनं स्पष्ट केलंय.
मुंबई : मुंबई वगळता राज्यातल्या 9 महापालिकांमध्ये रिपाइं आठवले गट आणि भाजपची युती नसल्याचं रिपाइंनं स्पष्ट केलंय.
त्याचप्रमाणे रिपाइंचे जे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणुकीत उतरले आहेत, त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलंय. लोणावळ्यात झालेल्या रिपाइंच्या राज्य कार्यकारिणीत हा ठराव मंजूर करण्यात आलाय. त्याचप्रमाणे पुणे शहर रिपाइंची कार्याकरिणीही बरखास्त करण्यात आलीय.
रिपाइंने भाजपकडे मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये युतीचा प्रस्ताव दिला होता. पण प्रस्तावावर निर्णय घेण्याआधीच रिपाइंच्या उमेदवारांना परस्पर कमळ हे चिन्हं दिलं. त्यामुळे मुंबई व्यतिरिक्त इतर सर्व महापालिकांमध्ये रिपाइ स्वबळावर लढणार असल्याचंही कार्यकारिणीनं म्हटलंय.