मुंबई : राज्य सरकारनं हमीभावावर अखेर कायद्याचा तोडगा काढलाय.  हमीभावापेक्षा कमी दरानं शेतमाल खरेदी केल्यास गुन्हा ठरणार आहे. यासंदर्भात लवकरच राज्य सरकार कायदा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षा निवासस्थानी आयोजित केलेल्या गट शेतीच्या आढावा बैठकीत त्यांनी हमीभावाबात चर्चा केली. तसंच गटशेती ही शेतक-यांचं उत्पादन दुप्पट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गट तयार झाल्यावर त्यांच्या माध्यमातून भौगोलिक परिस्थितीनुसार कृषी उत्पादन घेण्याचा सल्ला या बैठकीत देण्यात आला.


या उत्पादनाला पुरक असे ‘एकाच छत्राखाली पायाभूत यंत्रणा’ उपविभागीय स्तरावर निर्माण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जेणेकरुन शेतकऱ्याच्या कुठल्याही समस्येचे निवारण या ठिकाणी करता येऊ शकेल. गोदाम, शीतगृह यांची उपलब्धता उपविभागीय स्तरावर निर्माण झाल्यास नाशवंत कृषी उत्पादनाला त्याचा फायदा होऊ शकेल.