नवी मुंबई : मुलानंच आपल्या जन्मदात्या पित्याचा जीव घेतल्याची घटना नवी मुंबईत घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दशरथ चास्कर घणसोली सेक्टर-१६मध्ये राहत होते. त्यांना दारुचं व्यसन असल्यामुळे ते सर्वांकडून पैसे मागून दारु प्यायचे... यामुळे अनेकदा घरात भांडण ठरलेलं असायचं... रविवारीही घरात पुन्हा एकदा हेच घडलं...


रविवारी किरकोळ कारणावरुन त्यांचं मुलासोबत भांडण झालं. यावेळी मुलानं केलेल्या मारहाणीत ते खाली पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 


या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय. मात्र, या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात मृत दशरथ चास्कर यांच्या डोक्यावर आणि कपाळावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आढळून आल्याने त्यांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झालाय.


त्यानंतर, रबाळे पोलिसांनी सोमवारी रात्री या प्रकरणात मृत दशरथ यांचा मुलगा सागर याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.