मुंबई : मुंबईतल्या साकीनाका भागात एका पित्यानं त्याच्यातीन मुलींना ठार मारून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साकीनाका परिसरातल्या मोहाली व्हिलेजमध्ये राहणाऱ्या मंगेश अनेराव या 40 वर्षीय पित्यानं मुलींना विष पाजलं. मालमत्तेच्या वादातून मंगेशनं हे टोकाचं पाऊल उचललं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी सहा वाजता मंगेशनं त्याची बायको आणि मुलाला मिरारोडला नातेवाईकांकडे पाठवलं. यानंतर त्यानं एक वर्षाच्या दोन जुळ्या मुली आणि 4 वर्षाच्या एका मुलीला विष पाजलं आणि स्वतःदेखील विष पिऊन आत्महत्या केली.


मंगशेकडे सध्या कोणतंही काम नव्हतं. त्याच्या राहत्या खोलीवरून सख्खा भावाबरोबर वाद सुरु होता. राहती खोली विकून दोघांनी दुसरी जागा घेण्यासाठी मंगशेचे वडिल आग्रह करत होते. मंगेश ऐकत नसल्यामुळे वडिलांनी कायदेशीर मार्ग अवलंबला.