`केएफसी`च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी...
नवी मुंबईतल्या नेरूळच्या केएफसी हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केलीय. हे रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत.
नवी मुंबई : नवी मुंबईतल्या नेरूळच्या केएफसी हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केलीय. हे रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत.
'प्युरिफाईंग युनिट'मधल्या पिण्याच्या पाण्यात ई कोली आणि कोलीसॉर्म नावाचे जीवाणू आढळले आहेत. या रेस्टॉरंटच्या नियमीत तपासणीत हे जीवाणू आढळले आहेत. त्यामुळे केएफसीच्या इतरही हॉटेलची तपासणी होणार आहे.
कोकण विभागीय अन्न आणि औषध विभागानं हे आदेश दिले आहे. १३ मार्च रोजी या रेस्टॉरन्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची, पाण्याची पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर, ही गोष्ट समोर आल्याचं एफडीएचे सहाय्यक आयुक्त किशोर गोरे यांनी म्हटलंय.