VIDEO : डोंबिवली स्टेशनवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी
एका तरुणाला मारहाण करणाऱ्या टोळक्याला रेल्वेतील प्रवाशांनी चांगलाच चोप दिल्याची घटना मध्य रेल्वे मार्गावर घडलीय.
मुंबई : एका तरुणाला मारहाण करणाऱ्या टोळक्याला रेल्वेतील प्रवाशांनी चांगलाच चोप दिल्याची घटना मध्य रेल्वे मार्गावर घडलीय.
रेल्वेचा प्रवास आणि बाचाबाची-हाणामारी ही काही मुंबईकरांना नवीन नाही. असाच एक प्रकार गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास सीएसटी - कल्याण रेल्वेत घडला. सीएसटी ते कल्याण रेल्वे साधारण: १०.०७ ला दादार स्टेशनवर पोहचली होती... गाडीला १०-१५ मिनिटं उशीर झाल्यानं रेल्वेत प्रवाशांची बरीच गर्दीही झाली होती.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, याच गर्दीत एका मुलाचा धक्का लागल्यानं ५-६ तरुणांच्या एका टोळक्यानं या मुलाला ठाणे ते डोंबिवली दरम्यान मारहाण केली. हा सगळा प्रकार पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी यात हस्तक्षेप केला... दरम्यान, ११ वाजल्याच्या सुमारास डोंबिवली स्टेशनवर गाडी फलाटाला लागली आणि प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी या मारहाण करणाऱ्या टोळक्याला गाडीच्या बाहेर काढून चांगलाच चोप दिला.
डोंबिवली स्टेशनवर सुरू असलेला हा प्रकार पाहताच पोलीस तिथं दाखल झाले... आणि त्यांनी मार खात असलेल्या तरुणांना बाजुला घेण्याचा प्रयत्न केला... पण, त्यांना गर्दीला आवरणंही कठीण झालं होतं.
हे सगळं सुरू असताना रेल्वेही पाच-सात मिनिटे स्टेशनवरच थांबलेली होती.