मुंबई : 'टॅल्गो' रेल्वे अखेर मुंबईत दाखल झाली आहे. टॅल्गो पावसामुळे रखडली होती, पण आज सकाळी ती मुंबईत दाखल झाली. टॅल्गो ताशी १३० वेगाने धावते,  ही रेल्वे पावसामुळे उशीरा मुंबईत दाखल झाली. दिल्लीतून सोमवारी सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी ही गाडी रवाना झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास ४५ कोटी रुपये किंमतीची ही टॅल्गो आहे. टॅल्गो रेल्वे सुपरफास्ट राजधानीपेक्षाही अधिक वेगवान आहे. रेल्वेमंत्री प्रभू यांच्यासमोर 'टॅल्गो'कंपनीने जुलै २०१५ मध्ये आपले पहिले सादरीकरण केले होते.


या रेल्वेमुळे मुंबई ते दिल्ली दरम्यानच्या रेल्वे प्रवासाचा कालावधी काही तासांनी कमी होणार आहे. याच रेल्वेची ही दिल्ली ते मुंबई चाचणी करण्यात आली आहे.


टॅल्गोची पहिली चाचणी रेल्वे मंत्रालयाने मे महिन्यात उत्तर प्रदेशातल्या बरेली ते मोरादाबाद  दरम्यान केली.  त्यानंतर दुसरी चाचणी उत्तर मध्य रेल्वेच्या मथुरा ते पलवल मार्गावर घेण्यात आली. या दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई या लांब पल्ल्याच्या मार्गावर चाचणी घेण्यात आली. 


स्पॅनिश बनावटीच्या आणि पहिल्या दोन्ही चाचण्यांत देशातील सर्वांत वेगवान रेल्वेगाडी ठरलेल्या 'टॅल्गो'ची सर्वांना उत्सुकता आहे. सध्या राजधानीनेही १६ ते १७ तास लागणारा दिल्ली-मुंबई हा रेल्वे प्रवास यामुळे १२ तासांच्याही आत येणार आहे. 


अॅल्युमिनियम बॉडी असल्यामुळे 'टॅल्गो'चा चाचण्यांतील वेग जास्त आहे. 'टॅल्गो'चे डबे ऍल्युमिनियमपासून बनविलेले असल्याने वळणांवरही ती तेवढ्याच गतीने धावू शकते, हे स्पेनमध्ये सिद्ध झाले आहे.


दिल्ली ते मुंबई हे १ हजार ३८८ किलोमीटरचे अंतर १२ तास १० मिनिटांत कापू शकेल. या अधिकाऱ्याने आणखी एक तांत्रिक बाब सांगितली- ती अशी, की सध्याच्या भारतीय रेल्वेगाड्यांचे डबे लोखंडाचे असतात. 


लोखंडाच्या रेल्वे गाड्यांना रूळांवर तीव्र किंवा मध्यम वळणांवरही त्यांचा वेग कमी करावाच लागतो. पहिल्या दोन्ही चाचण्यांप्रमाणेच मुंबईपर्यंतच्या तिसऱ्या चाचणीतही 'टॅल्गो'ला ४५०० अश्‍वशक्तीचे भारतीय इंजिनच लावण्यात आले.