गोवंडीत झोपडपट्टीला भीषण आग, अनेक झोपड्या खाक
गोवंडीमध्ये रफिकनगर झोपडपट्टीतही भीषण आग लागली होती. यात अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. शुक्रवारी रात्री 8 च्या सुमाराला आग लागली होती.
मुंबई : गोवंडीमध्ये रफिकनगर झोपडपट्टीतही भीषण आग लागली होती. यात अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. शुक्रवारी रात्री 8 च्या सुमाराला आग लागली होती.
अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आणि 4 टँकरर्सच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. सुदैवानं या आगीत जिवीतहानी झाली नसली तरी काही लोकांना किरकोळ जखमा झाल्यात.