मुंबई : स्वाईन फ्लूचं लोण आता मुंबईमध्ये पसरलं आहे. वरळीच्या आंबेडकरनगर भागात राहणाऱ्या एका दीड वर्षाच्या बालकाचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यंदाच्या वर्षातला मुंबईतला हा स्वाईन फ्लूचा पहिला बळी आहे. आत्तापर्यंत मुंबईत स्वाईन फ्लूचे २१ रुग्ण आढळले आहेत.