अकरावीची पहिली मेरीट लिस्ट जाहीर
अकरावीची पहिली मेरीट लीस्ट आज जाहीर करण्यात आली.
मुंबई : अकरावीची पहिली मेरीट लीस्ट आज जाहीर करण्यात आली.
यंदाही मोठ्या कॉलेजांचा कट ऑफ नव्वदीपार गेला असून 1 लाख 49 हजार 808 प्रवेश जागांसाठी 2 लाख 17 हजार विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले होते.
त्यामुळे हवे ते कॉलेज मिळवणे यंदाही विद्यार्थ्यांसाठी कठीण जाणारेय. काही महत्वाच्या कॉलेजांची कट ऑफ पाहूया...
आज (सोमवारी) अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी http://fyjc.org.in/mumbai/ या अधिकृत वेबसाईटवर बघता येणार आहे. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी या यादीची आतुरतेने वाट बघत होते.
शिक्षण संचालकांनी जाहीर केलेल्या http://fyjc.org.in/mumbai/ या वेबसाईटवर ही यादी आज जाहीर करण्यात आली. याची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही देण्यात आली आहे. या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजांमध्ये २८ ते ३० जून दरम्यान ५० रूपये भरून प्रवेश निश्चित करायचा आहे.
असे न करणारे विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून बाद ठरवले जातील. यंदा २ लाख १७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून अकरावीच्या एकूण २ लाख ६९ हजार १७२ जागांपैकी फक्त १ लाख ४९ हजार ८०८ जागांवरच ऑनलाईन प्रवेश होणार आहेत. आणि त्यासाठी ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे येथीलही यादी जाहीर झाली असून ही यादी une.fyjc.org.in या वेबसाईटवर बघता येणार आहे. विद्यार्थ्यांनी संबंधीत माहिती पुरवून यादी बघावी.
मुंबईतील कॉलेजच्या कट ऑफ लिस्ट....
झेव्हिअर्स कॉलेजचा आर्ट्सचा कट ऑफ 94.4 टक्के इतका आहे तर सायन्सचा 91.4 टक्के
केसी कॉलेजचा कॉमर्सचा कट ऑफ 91.5 %
सायन्सचा 91 टक्के तर आर्ट्सचा 88.4 टक्के
जय हिंद कॉलेजचा आर्ट्सचा कट ऑफ 91.4 टक्के
कॉमर्सचा 91 टक्के तर सायन्सचा 90.06 ट्क्के इतका लागला आहे
वझे केळकर कॉलेजचा सायन्सचा कट ऑफ 92.8 टक्के, कॉमर्सचा 89.6 टक्के इतका आहे
रुपारेल कॉलेजचा सायन्सचा कट ऑफ 91.8 टक्के इतका आहे. तर कॉमर्सचा 89.60 टक्के
रुईया कॉलेजचा सायन्सचा कट ऑफ 93.2 टक्के तर आर्ट्सचा कट ऑफ 91.8 टक्के इतका आहे.