मुंबई : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दारूविक्रीवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातल्यानंतर राज्यातल्या जवळपास 1 हजार तारांकित हॉटेल्सना फटका बसणार आहे. मुंबईतल्या देशांतर्गत विमानतळावर असणाऱ्या व्हीआयपी लाऊंजमध्येही 1 एप्रिलपासून दारू विक्री बंद झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला तब्बल सात हजार कोटींचा फटका बसणार असल्याचं हॉटेल उद्योजकांचं म्हणणं आहे. मुंबईतील प्रमुख हॉटेल चालक मालक संघटना असणाऱ्या आहारच्या मते सुमारे १० हजार हॉटेल्स बार, रेस्टॉरंट्स आणि बारवर परिणाम होईल.


सरकारनं मोटर वाहन कायद्यामध्ये ज्याप्रमाणे बदल केला, त्याप्रमाणे डिनोटीफीकेशन करून तोडगा काढावा, अशी मागणी आहारचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी केली आहे.