मुंबई : मुंबईतील पाच जण इसिसमध्ये सहभागी झाल्याचं सांगण्यात येत आहे. इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेत ते सहभागी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धक्कादायक बाब म्हणजे हे पाचही जण मुंबईतले आहेत. २६ वर्षीय अश्‍फाक अहमद, त्याची पत्नी, त्यांची लहान मुलगी आणि २२ वर्षीय मुहम्मद सिराज आणि ३० वर्षीय एजाज रेहमान या ५ जणांनी भारत सोडल्याचे निष्पन्न झाले आहे. 


सिराज हा उद्योगपती आहे, तर रेहमान हा डॉक्‍टर आहे. हे दोघेही अहमद याचे चुलत भाऊ आहेत. या सर्वांनी इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या जून महिन्यातच भारत सोडल्याचे समोर आले आहे.


या प्रकरणी, मोहम्मद हनीफ या सध्या पोलिस कोठडीत आहे, त्याची चौकशी केली जात आहे. इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी अहमद आणि इतरांना हनीफ याने प्रेरणा दिल्यासंदर्भात ही चौकशी करण्यात येत आहे.


अहमद याचे पिता अब्दुल माजीद यांनी दाखल केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालामध्ये हनीफ याच्यासह इतरांनी अहमद याला इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप केला होता. 


जून महिन्याच्या गेल्या आठवड्यामध्येच अहमद याच्याकडून त्याच्या धाकट्या भावास मोबाईल संदेश आला होता. 'मी इसिसच्या ताब्यात असलेल्या भागामध्ये प्रवेश केला असून आता परत येणार नाही. तू आई वडिलांची काळजी घे,' असे या संदेशामध्ये अहमद याने म्हटले असल्याचं सांगण्यात येत आहे.