मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळतेय. दादरमध्ये प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जोरदार झेंडायुद्ध पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेरच्या दिवशी रोड शो, बाईक रॅलीच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतायत. 


वॉर्ड क्रमांक 191 मध्ये शिवसेनेच्या विशाखा राऊत आणि मनसेच्या स्वप्ना देशपांडे यांनी प्रचार रॅली काढली. यावेळी शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झेंडायुद्धा पाहायला मिळालं.


आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे जितक्या अधिक प्रमाणात प्रचार करता येईल यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत.