मुंबई : शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्याविरोधात शिवसेनेतून बंडखोरी झाली आहे. अँटॉप हिलऐवजी यावेळी भोईवाड्यातल्या वॉर्ड क्रमांक २०२ मधून उमेदवारी दिल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यमान नगरसेवक नंदकिशोर विचारे यांच्यासह शिवसैनिकांनी जाधव यांच्याविरोधात बंड केले आहे. मिरा निंबाळकर, साधना राऊळ आणि तृप्ती मोरे या तिघा महिला शिवसैनिकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.


विधानसभा निवडणुकीला भाजपचा एबी फॉर्म घेवून पक्षाशी गद्दारी करणाऱ्या श्रद्धा जाधवांना उमेदवारी कशी दिली, असा सवाल विचारे यांनी विचारला आहे.