मुंबई : तुमच्या आयुष्यात कुणीतरी येतंय ही खूपच चांगली गोष्ट असते. एका आनंदी जीवनाला तुम्ही सुरूवात करणार असतात. मात्र या उलट परिस्थिती येऊ नये, तुम्हाला कुणीही फसवू नये, म्हणून बसल्या जागी इंटरनेट असेल तर फक्त पाच मिनिटे वेळ द्या, आणि तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न करत आहात, त्या व्यक्तीचं नावाने हायकोर्टात कौंटुंबिक वादाची अथवा फारकत घेतल्याचं प्रकरण होतं किंवा आहे का ते पाहा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हायकोर्टाच्या वेबसाईटवर पार्टीच्या नावाने सर्च करा, त्या व्यक्तीचं नाव तिथे टाका, त्या व्यक्तीच्या नावावर किती प्रकरणं आहेत. ते समोर येईल, तर त्या व्यक्तीने यापूर्वी कुणाला तरी फसवलं असेल, किंवा त्याचा निर्वाळा झाला असेल, लग्न झालं असेल तर त्याची माहिती समोर येईल. हे तुमच्या भविष्यासाठी महत्वाचं ठरेल.


कारण अशी अनेक प्रकरण समोर आली आहेत, की काही व्यक्तीचं दुसरं, तिसरं लग्न असतं, तरी आपण पहिल्यांदाच लग्न करतोय असं दाखवतात, आणि नंतरही पुढे फसवणूक करत राहतात.