गणेश गल्लीच्या गणपतीचं मुखदर्शन
मुंबईत गणेशोत्सवाची एक वेगळीच धूम असते. मोठ मोठे देखावे तसेच देखण्या मुर्ती अशी मुंबईतील गणेशोत्सवाची ओळख. त्यापैकीच एक म्हणजे गणेशगल्लीचा राजा.
मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाची एक वेगळीच धूम असते. मोठ मोठे देखावे तसेच देखण्या मुर्ती अशी मुंबईतील गणेशोत्सवाची ओळख. त्यापैकीच एक म्हणजे गणेशगल्लीचा राजा.
मुंबईचा राजा अशी गणेश गल्लीच्या गणपतीची ओळख आहे. गणेश गल्लीत यंदा बद्रीनाथ मंदिर देखावा साकरण्यात आलाय.
मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात आणि यावेळेस तर बद्रीनाथचा देखावा साकारल्यानं हा देखावा पाहण्यासाठी निश्चितच गणेशभक्त मोठी गर्दी करणार यात शंकाच नाही.