मुंबई : मुलुंडमध्ये ७ वर्षीय चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या करण्यात आली आहे.  चिमुरडी शनिवारी रात्रीच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेतल्यानंतर तिथे पार्क केलेल्या ट्रक खाली चिमुरडी बेशुद्धावस्थेत सापडली. बेशुद्धावस्थेत असलेल्या चिमुरडीला सावरकर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.


धक्कादायक घटनेने अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 


दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नवघर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध हत्या, पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.