९९ टक्के मिळून कॉलेजमध्ये नाही अॅडमिशन
दहावीला 99 टक्के गुण मिळाल्यानंतरही कॉलेज अॅडमिशन मिळत नसेल तर याला काय म्हणायचं?
मुंबई : दहावीला 99 टक्के गुण मिळाल्यानंतरही कॉलेज अॅडमिशन मिळत नसेल तर याला काय म्हणायचं?
उल्हासनगरची साक्षी राजवानी या विद्यार्थिनीला सध्या हा धक्कादायक अनुभव आलाय. कॉमर्स प्रवेशासाठी साक्षीनं ऑनलाइन अर्ज भरला होता.
सोमवारी ऑनलाइन प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली. मात्र ९९.८० टक्के गुण मिळवूनही साक्षीचं नाव यादीत आलं नाही. त्यामुळं तिला मोठा मानसिक धक्का बसलाय.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतला तांत्रिक सावळागोंधळ यामुळं समोर आलाय. या प्रकाराची गंभीर दखल शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतलीय.
तिला वझे केळकर कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. मात्र या घटनेनं राजवानी कुटुंबियांना नसता मनस्ताप सहन करावा लागतोय...