मुंबई : मुंबईकरांसाठी आता एक गूडन्यूज... येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईतल्या म्हाडाच्या घरांची लॉटरी जाहीर होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

९७० घरांसाठी ही लॉटरी काढली जाणार आहे. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी ही माहिती दिली. 


तर उपनगरातील जुन्या इमारतींचा ३३/७ ए योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्याचा प्रयत्न म्हाडा करणार आहे. यासाठी सरकार धोरणात्मक निर्णय जाहीर करणार  आहे. 


३३/७ ए हा केवळ आत्तापर्यंत मुंबई शहरातील इमारतींना लागू आहे. आता ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही ३३/७ ए लागू करण्याचा विचार केला जातोय.