मुंबई : अंनत चतुर्थीनिमित्ताने उद्या मुंबई शहर आणि उपनगरात शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यभरात विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी झाली आहे. मुंबईच्या भव्यदिव्य मूर्ती, तर पुण्यातली पारंपारिक मिरवणूक उद्याचं आकर्षण असणार आहे. नाशिक, नागपूरसह सर्व शहरं आणि गावोगावी बाप्पाला उद्या वाजतगाजत निरोप देण्यात येईल. इकोफ्रेंडली विसर्जनाकडे भाविकांचा कल वाढला असल्यानं सर्वच शहरांमध्ये कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. दुसरीकडे सुरक्षा यंत्रणाही हाय अॅलर्टवर आहेत. 


उद्या दिवसभर गणपती विसर्जनाची धाम धूम सगळीकडे पाहायला मिळणार आहे मात्र असं असलं तरी या सगळ्या मध्ये नियमांचं उल्लंघन होवू नये,पोलिसांसोबत वाद घालू नये, महिला सुरक्षेची काळजी घ्यावी, अश्लील नृत्य करू नये, जे मंडळ गैरवर्तन करेल त्यांच्या मागे गणेशोत्सव समन्वय समिती उभी राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका समन्वय समितिने घेतली आहे.