`भारत माता की जय`वर विधानसभेत गोंधळ
`भारत माता की जय` च्या मुद्यावरून आज विधानसभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पुन्हा अनुभवायला मिळाला. `भारत माता की जय न बोलणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही` असं वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी विधानसभेत विरोधकांनी केली. तर विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.
मुंबई : 'भारत माता की जय' च्या मुद्यावरून आज विधानसभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पुन्हा अनुभवायला मिळाला. 'भारत माता की जय न बोलणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही' असं वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी विधानसभेत विरोधकांनी केली. तर विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.
मुख्यमंत्र्यांच्या नाशिकमधील याच विधानाचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. मुख्यमंत्र्यांनी या वक्तव्याबद्दल राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत केली. मुख्यमंत्री सभागृहात नव्हते त्यामुळे विरोधकांनी आपला गोंधळ सुरूच ठेवला. या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज तीन वेळा तहकूब करावं लागलं.