मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक भूमीपुजन सोहळ्याच्या निमित्तानं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलाय. त्याची माहिती देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हात भाजपा आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या या उपक्रमाची अधिकृत माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेला सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि खासदार शरद बनसोडे यांनी सोलापूरच नियोजन स्पष्ट केलं. या सोहळ्याच्या निमित्तान शहरातील भुईकोट किल्याची माती, पंढरपूरातून चंद्रभागा आणि कुडल संगम येथील भीमा सीना संगमावरच पाणी या सोहळ्यासाठी कलशातुन नेण्यात येणार आहे. 


भूमीपुजन सोहळ्याची पूर्व तयारी म्हणून येत्या २३ डिसेंबर रोजी चेंबूर येथून गेट वे ऑफ इंडिया पर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याचे भाजपच्यावतीने सांगण्यात आले आहे.