मुंबई : मराठी नव वर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह, गुढी उभारत, रागोंळ्या काढत हिंदू नव वर्षाचं उत्साहात स्वागत, पाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मराठी नववर्षाची सुरुवात. गुडीपाडव्याचा दिवस...या नव वर्षाचं नव्या आनंदानं, नव्या उत्साहानं, नव्या चैतन्यानं, नव्या जोशानं स्वागत. दारात गुढी उभारुन या नववर्षाच्या स्वागताची आपली परंपरा. आजचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक, त्यामुळे कोणतही काम सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ मानला जातो. आज संपूर्ण महाराष्ट्रात, प्रत्येक शहरात, गावागावात पाडव्या निमित्त विविध कार्यक्रम, शोभायात्रांचं आयोजन केलं जातं. त्यामुळे आजच्या या शुभ दिवसाची ही शुभ सुरुवात. झी मीडियाच्या सर्व वाचक, प्रेक्षकांना  नववर्षाच्या शुभेच्छा!


ठाण्यात भव्य दिव्य रांगोळी


हिंदू नववर्ष्याचं स्वागत करण्यसाठी सगळीकडेच जय्यत तयारी होत असतना ठाण्यात देखील नाववार्ष्याच स्वागतासाठी संस्कार भारतीच्यावतीनं एक भव्य दिव्य रांगोळी काढण्यात आलीय. ठाण्यातील गावदेवी मैदान इथं ही रांगोळी काढण्यात आलीय. 
रांगोळीच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती तसच पाणी टंचाईच्या विषयी जनजागृती व्हावी या करता जलसाक्षरता हा विषय प्रभावी पाने मांडण्यात आलाय. संस्कार भारतीच्या ५० हून अधिक सदस्यांनी सदरची रांगोळी १२ तासांच्या अथक प्रयत्नांनी काढलीय. 


डोंबिवलीत महारांगोळी


डोंबिवलीतल्या श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे दरवर्षी नववर्ष स्वागत निमित्तानं विविध उपक्रम आखले जातात. त्याचाच भाग म्हणून यावर्षी गणेश मंदिर संस्थानतर्फे मंदिरामध्ये महारांगोळी काढण्यात आली आहे. ही रांगोळी तब्बल ४८ फूट बाय १२ फुटांची आहे. 


या विशाल रांगोळीसाठी ७०० किलो रांगोळी आणि ३०० किलो रंग वापरण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या रांगोळीतून पाणी वाचवायचा महत्त्वपूर्ण संदेशही दिला गेला आहे. पाण्याची विविध १२ नावं या रांगोळीतून चितारण्यात आली आहेत. 


गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला कल्याण डोंबिवलीतली लेझीम आणि ढोलपथकं सज्ज झाली होती. आजच्या शोभायात्रेत सादरीकरण करण्यापूर्वी त्यांनी कसून सराव केला.


नाशिकमध्ये स्वागत यात्रा


हिंदू नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी नाशिकमध्येही जोरात सुरु आहे. गुढी पाडव्याच्या स्वागतासाठी नाशिकच्या सर्व विभागांतून स्वागत यात्रा काढल्या जातात. पारंपरिक पोशाखातली ढोल पथकं या स्वागत यात्रांचं मुख्य आकर्षण असतं. महिलांचा लक्षणीय सहभाग या ढोल पथकांमध्ये असतो. यानिमित्तानं पारंपरिक पोशाखांच्या मनासारख्या खरेदीसाठी ग्राहकांची दुकानांत गर्दी झाली आहे.