मुंबई हागणदारीमुक्त... महानगरपालिकेचा अजब दावा
मुंबई शहर हागणदारीमुक्त झाल्याचा अजब दावा, मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केला आहे. तसं पत्रच मुंबई महानगरपालिकेनं राज्य सरकारला पाठवलं आहे.
मुंबई : मुंबई शहर हागणदारीमुक्त झाल्याचा अजब दावा, मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केला आहे. तसं पत्रच मुंबई महानगरपालिकेनं राज्य सरकारला पाठवलं आहे.
ऑक्टोबर २०१४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात, मुंबई शहरभरातल्या २४ वॉर्डांमध्ये ११८ ठिकाणी हागणदारी होत होती. मात्र, आता ही सर्व ठिकाणं हागणदारीमुक्त केली गेल्याचा दावा, मुंबई महानगरपालिकेनं केला आहे.
त्याच वेळी रेल्वेच्या हद्दीत होणारी हागणदारी रोखण्यासाठी महापालिकेनं मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून सहकार्य करण्याचं आवाहन केलंय.
विशेष म्हणजे, मुंबईतल्या विविध भागांत तसंच रेल्वे हद्दीत उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे... असं असतानाही पालिका प्रशासनाचा मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचा दावा अजब म्हणावा असाच आहे.
दरम्यान, मुंबईत आत्तापर्यंत १ हजार ६४१ आसनांची नवीन शौचालयं बांधण्यात आली असून ३ हजार ८७७ आसनांच्या शौचालयांचं बांधकाम सुरु आहे. यापूर्वी महापालिका क्षेत्रात ८ हजार ४१५ शौचालयांमध्ये सुमारे ८० हजार आसने आहेत.