मुंबई : हार्बर रेल्वेमार्गावर सँडहर्स्ट रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. बिघाड दुरुस्त केल्यानंतर लोकल १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक अर्ध्यातास पूर्णपणे ठप्प झाली होती. मस्जिद आणि सँडहर्स्ट रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांचा खोळंबा झाला.


हार्बर मार्गावरील सीएसटीकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील सर्व स्थानकांमध्ये गर्दी होती. ऑफिस सुटण्याच्या वेळीच लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. अजूनही गाड्या लेट असल्याने लोकला गर्दी होत आहे.