मुंबई :  हार्बर मार्गावरील लोकलचा प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. आजपासून हार्बरवर १२ डब्यांच्या लोकल सुरु झाल्या आहेत. आतापर्यंत प्रायोगिक तत्वावर काही गाड्याच १२ डब्यांच्या चालविण्यात येत होत्या. आजपासून १२ डब्यांच्या गाड्या सुरु झाल्याने तिन्ही मार्गावरील ९ डब्यांच्या गाड्या इतिहास जमा झाल्या आहेत. सुरुवातीला हार्बरवर चार डब्यांची लोकल धावली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर आजपासून  सर्व गाड्या १२ डब्यांच्या चालविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे लोकलमधील प्रवास अधिक सुकर होणार आहे.


हार्बरचा असा हा प्रवास


- १९२५ ला चार डब्यांची गाडी धावली
- १९२७ ला ८ डब्ब्यांची गाडी मेन लाईन आणि हार्बर मार्गावर सोडण्यात आली.
- १९६१ रोजी ९ डब्यांची लोकल मेन मार्गावर धावली
- १९८६ ला १२ डब्यांची लोकल मध्य रेल्वे मार्गावर धावली.
- १९८७ ला १२ डब्यांची लोकल कर्जतपर्यंत धावली
- २००८ ला  १२ डब्यांची लोकल कसारापर्यंत धावली
- २०१० ला १२ डब्यांची लोकल ट्रान्स हार्बरवर सुरु झाली.
- २०१२ ला १५ डब्यांची लोकल मध्य रेल्वे मार्गावर धावली
- २०१६पासून ९ डब्यांची लोकल इतिहास जमा झाली आहे.