संपकरी डॉक्टरांना हायकोर्टाचा दणका
संपकरी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा जोरदार झटका दिलाय. उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत.
मुंबई : संपकरी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा जोरदार झटका दिलाय. उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत.
तसंच कामावर रुजू न झाल्यास कारवाई करण्याचे आदेशही कोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत. डॉक्टरांनी त्यांची आडमुठी भूमिका सोडली नाही, तर आम्ही त्यांना संरक्षण देऊ शकत नाही असंही कोर्टानं स्पष्ट आहे.
तुम्ही कोर्टात एक भूमिका घेता, कोर्टाबाहेर दुसरी भूमिका घेता हे धोरण चुकीचं असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. त्याचप्रमाणे मार्डनं तीन वाजेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावं असंही कोर्टानं म्हटलंय.
प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही, तर अवमानाची कारवाई करू असं सज्जड दमही कोर्टानं दिलाय. आता मार्डनं मात्र संपातून आपले हात झटकण्याचं ठरवलंय. संपातून मार्डनं माघार घेतलीय..
निवासी डॉक्टरांनी कामावर येण्यास नकार दिला तर त्याला मार्ड जबाबदार नसल्याचं कोर्टात संघटनेच्या वतीनं सांगण्यात येणार आहे.