मुंबई : एखाद्या हॉटेलवर धाड टाकण्याआधी पोलिसांना आता नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे. यामुळे पोलिसांना आपल्या अधिकारांचा गैरवापर करता येणार नाही, अशी माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी उत्तर मुंबईतल्या मालवणी भागामधल्या एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला होता. हॉटेलमधल्या तरुण आणि तरुणींना अश्लीलता पसरवण्याच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी दंडही ठोठावला होता. 


या कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. त्यावरच्या सुनावणीत कारवाईवर ताशेरे ओढताना, पोलिसांना कोणाच्याही खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं.