बलात्कार लपवण्यासाठी पीडिताला ३० रूपये दिले
एका मुलीवर बलात्कार केल्यानंतर कुणालाही सांगू नये, म्हणून तिला ३० रुपये दिले. या मुलीच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. तिला अन्य पाच भावंडे आहेत. वडिल हे या कुटूंबामधील एकमेव कमावते सदस्य होते.
मुंबई : एका मुलीवर बलात्कार केल्यानंतर कुणालाही सांगू नये, म्हणून तिला ३० रुपये दिले. या मुलीच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. तिला अन्य पाच भावंडे आहेत. वडिल हे या कुटूंबामधील एकमेव कमावते सदस्य होते.
एका अत्यंत गरीब घरातील ९ वर्षीय मुलीवर बलात्कार केलेल्या ५१ वर्षीय आरोपीस वरळी पोलिसांनी अटक केली आहे.
रंबाली सरोज असे आरोपीचे नाव आहे. सरोज याने या कुटूंबाच्या अडचणीचा फायदा घेत या मुलीवर बलात्कार केला. यानंतर तिने या प्रकाराची माहिती कोणालाही देऊ नये, यासाठी त्याने तिला ३० रुपयेही देऊ केले.
पीडित मुलीच्या पोटामध्ये दुसऱ्या दिवशी असह्य वेदना होऊ लागल्यानंतर तिच्या आईने वैद्यकीय तपासणीस नेले. या तपासणीदरम्यान या मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले.
हा बलात्कार इतका अमानुष होता, की पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर घटनास्थळी केलेल्या तपासणीमध्ये रक्ताचे मोठे डाग आढळून आले.
सरोज याने याआधीही अशा स्वरुपाचा कोणता गुन्हा केला आहे काय, याची तपासणी आता पोलिस करत आहेत.
फरार झालेल्या सरोजला पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्याला १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.