मुंबई : भारतीय रिझर्व्ह बॅंक आणखी एक नवीन नोट चलनात आणणार आहे. 500 आणि 2000 हजारांच्या नोटा चलनात आणल्यानंतर बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध आणले होते. आता आरबीआय 100 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

100 रुपयांच्या नवीन नोटा या महात्मा गांधी सीरीज-2005 प्रमाणे असणार आहेत. मात्र, नोटांवर दोन्ही नंबर पॅनलवर इन्सेटमध्ये R लिहिलेले असेल. या नोटांवर सध्याचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही असणार आहे.


दरम्यान, सध्या चलनात असणाऱ्या 100 रुपयांच्या नोटा कायम राहणार आहेत. नव्या नोटांवरील नंबर हे पॅनलवर चढत्या क्रमाने असणार आहेत.