मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट असणार आहे.

 

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट असेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.

 

या सगळ्या भागांत पारा चाळीसी पार करेल असा अंदाज आहे. गुजरात, उत्तर भारतातून उष्ण वारा वाहत असल्याने महाराष्ट्र उष्णतेची लाट असेलं. 

 

त्यामुळे महत्त्वाचे काम असेल तरच दुपारच्या वेळेस घराबाहेर पडा. दुपारी चारनंतर शक्यतो सर्व कामे करा.