मुंबई : पुढील दोन दिवस सर्वांसाठी तापदायक ठरणार आहेत.. राज्यात खास करुन मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भ आणि गोव्यात येत्या दोन ते तीन दिवसांत तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीये.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्वीकडून येणा-या उष्ण वा-यांमुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.. महाराष्ट्र विदर्भ वगळता बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून तापमानत घट होताना दिसत होती. 


मध्य महाराष्ट्रातील उष्णतेची लाट मागील आठवड्यातच ओसरली होती. मात्र विदर्भातील तापमान काही घटलं नव्हतं.. त्यात आता  पुन्हा पारा २ ते 3 अंशांनी चढणार असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी.. शक्यतो दुपारी 11 ते 2च्या सुमारास घराबाहेर पडणं टाळा असा इशारा हवामान खात्यानं दिलाय.