आरे कॉलनीत हेलिकॉप्टरला अपघात
मुंबईत हेलिकॉप्टरची दुर्घटना झालीये. आरे कॉलनीतील रॉयल पाम्स येथे हा अपघात झालाय.
मुंबई : मुंबईत हेलिकॉप्टरला अपघात झालाय. आरे कॉलनीतील रॉयल पाम्स येथे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालंय.
रॉबिन्सन आर-44 असं हे हेलिकॉप्टर असून यात जखमी झालेल्या चार प्रवाशांपैकी एका महिलेचा आणि पायलटचा मृत्यू झाला. अपघातानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली.
दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आलेत. हेलिकॉप्टरला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पहायला मिळाले..