मुंबई: तुमच्या पत्नीला किंवा मैत्रिणीला बाईकवर फिरायला घेऊन जाणार असाल, तर सोबत तिच्यासाठीही एक हेल्मेट घ्यायला विसरू नका, अनथ्या तुम्हाला तुमचा सैरसापाटा महागात पडण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने बाईकवर मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेटसक्ती लागू केली आहे. शुक्रवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी सुरू झालीय. शिवाय ही कारवाई कठोरपणे करण्यात येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.  


रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेटसक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आला होता. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी जोरदार मोहीम राबविली होती. 


यात हजारो मोटारसायकलस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ आता मोटारसायकलस्वाराच्या मागे बसणाऱ्या सहप्रवाशांना  हेल्मेट सक्तीने घालण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी दिले काढले आहेत.