हायकोर्टाचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर ताशेरे
भोसरी एमआयडीसीमधल्या वादग्रस्त भूखंड प्रकरणी हायकोर्टानं माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर ताशेरे ओढलेत. मंत्रीपदी असताना कोणत्याही व्यक्तीनं अथवा संबंधितांनी असा व्यवहार करणं अपेक्षित नाही असं न्यायालयानं सुनावलंय.
मुंबई : भोसरी एमआयडीसीमधल्या वादग्रस्त भूखंड प्रकरणी हायकोर्टानं माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर ताशेरे ओढलेत. मंत्रीपदी असताना कोणत्याही व्यक्तीनं अथवा संबंधितांनी असा व्यवहार करणं अपेक्षित नाही असं न्यायालयानं सुनावलंय.
हेमंत गावंडे यांनी दाखल केलेल्या रीट क्रिमिनल याचिकेवर आज सुनावणी झाली. या प्रकरणी एमआयडीसी, महसूल विभाग आणि पोलीस खात्यानं दोन आठवड्यांत आपला अहवाल सादर करावा, असे आदेशही कोर्टानं दिलेत. या प्रकरणाची काय चौकशी केली, अशी विचारणा पोलिसांना केली आहे.