मुंबई : राज्यातल्या कुपोषणाच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोजच मुंबईलगतच्या भागातून कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंच्या बातम्या येतात, हे गंभीर असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई नजिकच्या भागात हे चित्र असेल तर राज्यातल्या दुर्गम भागात काय परिस्थिती असेल, असा सवालही न्यायालयानं या निमित्तानं केला. कुपोषणाची समस्या संपवण्यासाठी केंद्र 2 हजार कोटींचा निधी राज्याला देतं, तर हा निधी जातो कुठे असा प्रश्नही त्यांनी केला. 


कुपोषणाची समस्या सोडवण्याकरता आवश्यक अधिकारी, कर्मचा-यांची नेमणूक केली आहे का, अशी विचारणाही न्यायालयानं केली. सरकारकडे यंत्रणा असूनही इतक्या वर्षांत काहीच बदल झालेला दिसत नसल्याबद्दलही त्यांनी सरकारला फटकारले आहे.