मुंबई : हॉटेलमध्ये जेवणानंतर पाचशे रुपयाची जुनी नोट दिल्यामुळे हॉटेल मॅनेजर आणि वेटरनं एका जोडप्याला बेदम मारहाण केली आहे. मुंबईतल्या माहिम परिसरातील गंगाविहार हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमरास ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या जोडप्याच्या जेवणाचं बील 580 रुपये झालं, यानंतर त्यांनी कार्ड स्वाईप करण्यासाठी दिलं, पण कार्ड न चालल्यामुळे त्यांनी हजार आणि पाचशेची नोट देऊ केली. हॉटेल चालकानं या नोटा स्वीकारणार नसल्याचं सांगितल्यावर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर नंतर हाणामारीमध्ये झालं. या जोडप्यातल्या महिलेलाही मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.