अमित जोशी, झी मीडिया मुंबई : मुंबईत गिरगांव चौपाटीजवळची जागा शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निश्चित केली गेली आहे. 16.86 हेक्तर आकाराच्या खडकावर हे स्मारक उभारले जाणार आहे. हि जागा गिरगांव चौपाटीपासून 3. 6 किमी अंतरावर, नरिमन पॉईंटपासून 2.6 किमी अंतरावर, तर राजभवनपासून 1.2 किमी अंतरावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्मारकाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहचण्यासाठी नरिमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नवी मुंबई, वर्सोवा या ठिकाणाहुन बोटीच्या  सुविधा उपलब्ध असणार आहे.


प्रकल्प कसा असणार आहे हे बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून


कशी असेल रचना... 


जलदुर्गाच्या तटबंदीला साजेशी अशी या स्मारकाची भिंत असणार आहे, तशा पद्धतीचे प्रवेशद्वारही असणार आहे.


स्मारकात प्रवेश केल्यावर राज्याची कुलदैवत आणि छत्रपती यांचे आदरस्थान असलेल्या तुळजाभवानीचे भव्य मंदिर असणार आहे.


तर त्यांनतर शिवाजी महाराज यांच्या जन्मापासूनचे राज्याभिषेकापर्यंत घटना दाखवणारे प्रत्यक्ष जिवंत देखावे साकारले जाणार आहेत.


त्यानंतर शिवकाल उलगडवून दाखवणारे मोठे कला संग्रहालय आणि ग्रंथालयहि असणार आहे.


तसंच या भागांत अँपीथीअटर, साउंड अँड लाईट शो, थ्री डी आयमॅक्स थिएटर असणार आहे.


त्याचबरोबर अत्यंत आकर्षक असे मत्सालय या ठिकाणची शोभा वाढवाणार आहे.


एकाच वेळी जास्तीत जास्त दोन हजारपेक्षा जास्त पर्यटकांना सामावून घेण्याची या स्मारकाची क्षमता असणार आहे. तेव्हा तशी सुसज्ज अशी रेस्टोरंटची व्यवस्थाहि असणार आहे


आणीबाणीच्या वेळी उपचार करता यावेत यासाठी छोटेखानी हॉस्पिटलदेखील स्मारकाच्या ठिकाणी असणार आहे.


पर्यटकांच्या बोटींना सामावून घेण्यासाठी दोन मोठ्या जेट्टीबरोबर हेलिपॅडचीहि सुविधा असणार आहे


अर्थात सर्वात मुख्य आकर्षण असणार आहे ते म्हणजे महाराजांचा 210 मीटर उंचीचा पुतळा. या पुतळ्याच्या आतमध्ये लिफ्टची सुविधा असणार असून त्यामधून स्मारकाचे, मुंबईचे अनोखे दर्शन घेता येणार आहे.


संपूर्ण  3600 कोटी किंमतीच्या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा सुमारे 2600 कोटी रुपयांचा असणार आहे. पहिल्या टप्प्यात पुतळा, जेट्टी, हेलिपॅड, स्मारकाची तटबंदी, तुळजाभवानी मंदिर, रेस्टोरंट, हॉस्पिटल अशी प्रमुख कामे केली जाणार आहेत. पहिला टप्पा फेब्रुवारी 2019 पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याचा दावा स्मारक समितीने केला आहे.


सर्वात मुख्य म्हणजे स्मारक जरी समुद्रात असले तरी पावसाळ्यासह 12 महिने स्मारकाला भेट देता येईन अशी व्यवस्था केली जाणार आहे. 


एकदरीत स्मारकाचा पसारा बघितला तर हे स्मारक जगातील 9 वे आश्चर्य ठरेल यात शंका नाही.