मुंबई : मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातामुळे ईस्टर्न फ्रीवेवर ट्रॅफिक जाम झालाय. सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात घडलाय. 


या टॅक्सीतून तीन महिला, दोन मुले आणि इतर पुरुष असे नऊ जण प्रवास करत होते. यावेळी ईस्टर्न फ्रीवेवर ही टॅक्सी उलटल्याने हा अपघात झाला. 


या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झालेत. जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये टॅक्सीच्या ड्रायव्हरचाही समावेश आहे.