मुंबई : कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी अशी ओळख असलेले आय ए एस अधिकारी महेश झगडे यांनी आपल्या व्यक्तीगत आयुष्यातल्या कृतीतूनही समाजापुढे आदर्श ठेवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेश झगडे यांच्या डॉक्टर असलेल्या मुलीचं लग्न 20 डिसेंबरला झालं. महेश झगडे यांनी आपल्या उच्चशिक्षीत मुलीचं लग्न साधेपणाने करुन लग्नाच्या खर्चात बचत केली. आणि ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दिली.


 आमदार, खासदार, मंत्री यांच्या प्रमाणेच आयएएस आयपीएस अधिका-यांच्या मुलांची लग्नही राजेशाही थाटात  होताना दिसतात. पण महेश झगडे यांनी त्याला फाटा देऊन, नवा आदर्श घालून दिला आहे.