मुंबई : विरार जवळच्या अर्नाळा गावात एक चमत्कारिक घटना घडली आहे. हवनकुंडासाठी खोदकाम करत असताना देवीची मूर्ती सापडली आहे.  गावाच्या सुख समाधानासाठी आणि गावावर कोणतेही संकट येवू नये यासाठी  आर्नाळा गावातील कोळीवाडा परिसरात दरवर्षी वैशाख महिन्यात नवचंडी होम केला जातो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या होमाचं हवनकुंड बनवण्यासाठी गावकऱ्यांनी मंगळवारी एक खड्डा करण्यात सुरुवात केली मात्र ३ फूट अंतरावर त्यांना देवीचा मुखवटा असलेली एक मूर्ती दिसली.  


ही मूर्ती दिसल्यानंतर गावक-यांनी आणखी खोदकाम करून ही मूर्ती बाहेर काढली. १ फूट उंचीची ही मूर्ती आहे. विशेष म्हणजे मागील १७ वर्षांपासून याच ठिकाणी देवीचा नवचंडी यज्ञ केला जातो.


देवीची हि मूर्ती दगडी स्वरूपात आहे. सुबक आणि रेखीव कोरीव काम  केलेली हि मूर्ती आहे. आज नवचंडी यज्ञा  दरम्यान देवीला अभिषेक घालून विधीवत पूजा करण्यात आली. या देवीच दर्शन घ्यायला आता लोकांची गर्दी  होवू लागली आहे.