मुंबई : ही बातमी आहे शाळेत न जाणाऱ्या एका हुशार मुलीची... मुंबईतल्या १७ वर्षांच्या मालविका राज जोशी हिला दहावी किंवा बारावीची परीक्षा न देताही थेट अमेरिकेच्या 'एमआयटी'मध्ये प्रवेश मिळालाय.


सर्टिफिकेटपेक्षा ज्ञान महत्त्वाचं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालविका कम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये अतिशय हुशार आहे. तिची ही हुशारी पाहूनच तिला मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात 'एमआयटी'मध्ये अॅडमिशन मिळालीय. मालविकानं बारा-तेरा वर्षांची असतानाच शाळा सोडली. विशेष म्हणजे तिला शाळेतून काढण्याचा निर्णय तिच्या आईचा - सुप्रियाचा होता. तिच्या आईनं तिला 'होम स्कूलिंग' अर्थात घरातूनच शिक्षण देण्याचा विचार केला.... आणि ते यशस्वीही करुन दाखवलं. सर्टिफिकेटपेक्षा ज्ञान मिळवण्यावर त्यांचा जास्त विश्वास आहे. 


'एमआयटी'कडून स्कॉलरशिप


मालविका आता बॅचलर ऑफ सायन्स अर्थात बीएसस्सी करणार आहे. त्यासाठी 'एमआयटी'नं तिला स्कॉलरशिपही दिलीय. 


मालविकानं इंटरनॅशनल इन्फॉरमॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये (गणित, भौतिकी आणि कम्प्युटर) तीन वेळा मेडल मिळवलंय. तिनं दोन रजत आणि एक कांस्य पदक पटकावलेत. यानंतर तिला कोणत्याही डिग्री किंवा सर्टिफिकेटशिवाय एमआयटीमध्ये प्रवेश मिळाला. 


आयआयटीमध्ये प्रवेश अशक्य


मालविकाला देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटीमध्ये प्रवेश घेणं कठिण वाटत होतं. कारण, इथे प्रवेश घेण्यासाठी अनेक कडक नियम आहेत. प्रवेश घेण्यासाठी इथं बारावी पास असणं गरजेचं आहे.