प्रशांत अंकुशराव, झी, मीडिया, मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने टोलनाका सुरू झालाय. खासगी गाड्यांकडून हा टोल वसूल केला जात नसला तरी व्यावसायिक गाड्यांकडून टोल वसूल केला जातोय. त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत प्रवेश करण्याकरीता जे मार्ग आहेत त्या मार्गाने मुंबईत प्रवेस केल्यास टोल भरूनच प्रवेश करावा लागतो. मात्र, मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाहेरून गाडी घेऊन गेलात तर आपल्याला टोल भरावा लागतो. खासगी वाहनांकडून टोल वसूल केला जात नसला तरी व्यावसायिक वाहनांकडून १३० रुपयांचा टोल वसूल केला जातोय. 


'जीव्हीके'तर्फे अशा प्रकारचे फलक लावून वसूली केली जातेय. या टोल वसुलीचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. हा टोल अवैध असून अवैध वसुली बंद करून कंपनीविरोधात त्वरीत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आलीय. या वसुलीविरोधात मनसेकडून जनहित याचिका दाखल करण्यात आलीय. 


२०१६ मध्ये ही टोलवसुली बंद करण्यात आली होती. मात्र, पुन्हा दारं वाढवून ती सुरू करण्यात आलीत. जर टोल देखभालीकरिता वसूल केला जात असेल तर त्याचा हिशोब कोण ठेवतं आणि किती दिवस सुरू राहणार याची उत्तरं मिळेपर्यंत वाहनचालक निमुटपणे पैसे भरून निघून जातात.