मुंबई :  जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी,  हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. यात या निवडणुकीसाठी खालील तारखा महत्वाच्या आहेत.


पहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषद आणि १६५ पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.
पहिल्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत २७ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत असेल.
पहिल्या टप्प्यातील अर्जाची छाननी २ फेब्रुवारी २०१७
पहिल्या टप्प्यासाठी जिल्हा न्यायाधीशांकडे अपिलाची मुदत ५ फेब्रुवारी २०१७
न्यायालयाच्या निकालाची संभाव्य अंतिम तारीख ८ फेब्रुवारी २०१७
अपील नसल्यास उमेदवारीच्या माघारीची तारीख ७ फेब्रुवारी  २०१७
अपील असल्यास उमेदवारीच्या माघारीची तारीख १० फेब्रुवारी  २०१७
मतदान केंद्रांची यादी प्रसिद्धी करण्याची तारीख १० फेब्रुवारी  २०१७
पहिल्या टप्प्यासाठी मतदानाची तारीख  १६ फेब्रुवारी  २०१७
पहिल्या टप्प्यासाठीमतमोजणीती तारीख २३ फेब्रुवारी  २०१७