मुंबई : आता एक चांगली बातमी आहे. कुटुंबात एकाकडे जातीचा दाखला असेल तर कुटुंबातील अन्य सदस्यांना या दाखल्यासाठी कागदपत्रे देण्याची गरज नाही. त्यांना थेट जातीचे दाखले दिले जातील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केली. जातीचा दाखला मिळवण्यासाठी शासन दरबारी अनेक हेलपाटे मारावे लागतात. दाखला मिळण्याच्या प्रक्रियेसाठी वेळही खूप लागतो. 


मात्र आाता राज्य सरकारच्या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळालाय. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया किंवा नोकरीसाठी अनेकांना जातीचे दाखले द्यावे लागतात. अशा वेळी कुटुंबात एकाकडे हा दाखला असल्यास त्याचा फायदा कुटुंबातील इतर सदस्यांनाही होणार आहे.