मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पेंग्विन कक्षाचा लोकर्पण सोहळा भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात पार पडला. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. शनिवारपासून हा पेंग्विन कक्ष दर्शकांसाठी खुला होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सोहळ्यापूर्वी शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकले. शिवसेनेने तयार केलेल्या पेंग्विन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यावर भाजपनं बहिष्कार टाकला.


जिजामाता उद्यानात इतर प्राणी-पक्ष्यांनाही आणून उद्यानाचा विकास केला असता, तर तशा लोकार्पण कार्यक्रमाला गेलो असतो असा उपरोधिक टोला भाजपचे मुंबई महानगरपालिका गटनेते मनोज कोटक यांनी लगावलाय. सोबतच पेंग्वीन कक्षाच्या लोकार्पण कार्यक्रमाबाबत आपल्याला प्रसारमाध्यमांकडूनच कळत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.  


दरम्यान, या पेंग्विन कक्षाची एक झलक आदित्य ठाकरेंनी फेसबुकवर पाहायला मिळतेय.