पाहा प्राप्तीकर खाते कसं शोधतंय `कर चोर`?
करचोरी करणाऱ्या करदात्यांच्या शोधासाठी प्राप्तिकर विभागाने आता अधिक व्यापक मोहिम हाती घेतली आहे. या अंतर्गत मंगल कार्यालयांपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत विविध ठिकाणतझालेल्या व्यवहारांच्या तपशिलाची छाननी करून त्यामार्फत करचोरी करणाऱ्यांपर्यंत कर विभाग पोहोचत आहे.
मुंबई : करचोरी करणाऱ्या करदात्यांच्या शोधासाठी प्राप्तिकर विभागाने आता अधिक व्यापक मोहिम हाती घेतली आहे. या अंतर्गत मंगल कार्यालयांपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत विविध ठिकाणतझालेल्या व्यवहारांच्या तपशिलाची छाननी करून त्यामार्फत करचोरी करणाऱ्यांपर्यंत कर विभाग पोहोचत आहे.
पॅन कार्डाचा नंबर २ लाख रुपये आणि त्यावरील कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी देणे बंधनकारक आहे. त्यामुळे कर विभागाचे अधिकारी या घटकांत खर्च होणारा पैसा, इथे होणारे व्यवहार यांचा तपास पॅन कार्डाच्या आधारे शोधत आहेत. याखेरीज गेल्या काही वर्षांत झालेले रियल इस्टेटचे व्यवहार आणि आलीशान गाड्यांची खरेदी आदी व्यवहारांचीही पडताळणी करण्यात येत आहे.
करचोरीच्या नियमित मार्गांचा वेध घेतानाच कर विभागाने सध्या लग्नसराई असल्यामुळे मंगल कार्यालये, डेस्टिनेशन वेडिंग तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये होणारे लग्नसोहळे, हॉटेल्समधून होणाऱ्या पार्ट्या, क्रूझवरील बुकिंग्ज, परदेशी प्रवास आदी अनेक घटकांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.