मुंबई : बिहारचा सिंगम अशी ओळख असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे आजपासून महाराष्ट्र पोलीस सेवेत रूजू झाले आहेत. शिवदीप लांडे यापूर्वी बिहार पोलिस सेवेत कार्यरत होते, तीन वर्षासाठी शिवदीप लांडे यांची बदली महाराष्ट्रात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवदीप लांडे आता महाराष्ट्राला तीन वर्ष सेवा देणार आहेत.शिवदीप लांडे यांना सिंघम अशी ओळख आवडत नसली तरी ते बिहारमध्ये सिंघम म्हणूनच ओळखले जात होते. यापूर्वी बिहार पोलिसांच्या पोशाखात दिसणारे, शिवदीप लांडे आता महाराष्ट्र पोलिसांच्या पोशाखात दिसणार आहेत. 


शिवदीप लांडे यांच्याकडे कोणती जबाबदारी मिळते आणि ते कसं काम करून दाखवतात, त्यांची धडाकेबाज युवा अधिकारी म्हणून असलेली ओळख ते कशी टिकवून ठेवतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.